शहादा तालुक्यातील अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदील... दिनू गावित
ऍग्रो वन

शहादा तालुक्यातील अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदील...

शहादा तालुक्यातील वडाळी, दोडवाडे, फेस, बामखेडा, हिंगणी, तोरखेडासह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: एकीकडे आस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे वीज कंपनीच्या पर्यायाने सरकारच्या वीज तोडणीच्या सुलतानी धोरणामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे चित्र शहादा तालुक्यातील तोरखेडासह वडाळी, बामखेडा, फेस, हिंगणी परिसरात पाहावयास मिळत आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, व्यथा जाणून घ्यायला कुणीही तयार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. (Due to power outage in many villages of Shahada taluka, farmers were deported)

हे देखील पहा -

दिवाळी साजरी करायची की वीजबील भरायचे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये वीज तोडणी करण्यात येत असल्याने दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वीज कंपनीने वीज तोडणीची मोहीम चुकिच्या वेळी हाती घेतली आहे. सध्या आम्हां शेतकऱ्यांचे खाण्याचे वांदे झाले आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीके वाया गेली. थोडेफार आहे त्यांना पाणी देऊन दिवाळी साजरी करण्यापुरता माल हाती लागण्याची आशाही संपुष्टात आल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

SCROLL FOR NEXT