Power Crisis Saam TV
ऍग्रो वन

महाराष्ट्रात वीज संकट! 'राणां' पेक्षा 'राना' मधला प्रश्न गंभीर

अनेक ठिकाणी रात्रीची वीज सोडली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

साम टिव्ही ब्युरो

डॉ. राजकुमार देशमुख

राज्यासमोर 'राणा' दांपत्यापेक्षा गावागावातील 'राना' चा प्रश्न विजेच्या भारनियमनामुळे गंभीर बनला आहे. मागील दोन वर्षात राज्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे मात्र विजेच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेली पिके ही विद्युत पंप बंद असल्यामुळे जळू लागली आहेत. महाराष्ट्रात भारनियमानविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी संघर्ष हा पाचवीलाच पुजला आहे.

अनेक ठिकाणी रात्रीची वीज सोडली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मध्यरात्री पाण्याच्या पाळ्या कराव्या लागत असल्याने साप, विंचवासह हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यासही सामोरे जावे लागणार आहे. विजेचा खेळ हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ बनला असताना महत्वाच्या नसणाऱ्या राणा दांपत्याच्या आंदोलनाला एवढे महत्व कशासाठी हा प्रश्न राज्यातील सामान्य जनतेला पडला आहे.

प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांच्या गंभीर प्रश्नांना बगल देऊन इतर स्टंटबाजी आंदोलनांना जास्त प्रसिद्धी मिळत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आधीच बिकट झाली असताना त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने फळ बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे एकीकडे महागाईच्या झळा सोसत असतानाच शेतकऱ्यांवरच्या संकटाची मालिका संपताना दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राहुल गांधी आज अमरावती दौऱ्यावर, धामणगाव येथे जाहीर सभा

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT