Shirpur News Saam tv
ऍग्रो वन

Shirpur News : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शिरपूर तालुक्यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

भूषण अहिरे

धुळे : राज्यातील अनेक भागात पार्टीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. काही भागात तर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिरपूर तालुक्यात देखील बुधवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भटाने, जवखेडा, वरुळ या परिसरामध्ये वादळी वारासह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे येथील केळी पिकाचे त्याचबरोबर पपई, कापूस, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रवींद्र धनगाव असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून संबंधित शेतकऱ्याने आपल्या जवळपास तीन एकरामध्ये लाखो रुपये खर्च करून केळीचे पीक घेतले होते. 

केळी झाली जमीनदोस्त 

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या शेतकऱ्याच्या शेतात लावलेले संपूर्ण केळीचे झाडे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कृषी विभागातर्फे लवकरात लवकर या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करावी आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

SCROLL FOR NEXT