Farmer Snake Bite Saam tv
ऍग्रो वन

Snake Bite: विषारी सापाचा दंश, शेतकऱ्याचा मृत्‍यू

विषारी सापाचा दंश, शेतकऱ्याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

म्हसदी (धुळे) : येथील एका शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्पदंशाने (Snake Bite) दुर्दैवी मृत्यू झाला. उतार वयातही मुलांना शेती व्यवसायात मदत करत उत्तम शेतीचा आदर्श घालून देणाऱ्या बळीराजाच्या (farmer) मृत्यूमुळे म्हसदीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule News Snake Bite)

येथील शेतकरी तथा पांझरा- कान सहकारी साखर कारखान्याचे (Dhule News) निवृत्त कर्मचारी शांताराम बळीराम देवरे (वय 73) हे दिवसभर शेती कामात व्यस्त होते. सायंकाळी शेतात काम करताना असताना त्यांना सर्पदंश झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारार्थ (Sakri) साक्री येथे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अतिविषारी नागाने दंश केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी म्हसदीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार‌ करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अखेरपर्यंत शेतीत राबणाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पांझरा- कान सहकारी साखर कारखाना सुरू असेपर्यंत कारखान्यात आणि त्यानंतर अखेरपर्यंत शेतीत राबणाऱ्या बळीराजाच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त झाली. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्याच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Rice Cream For Face: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? घरच्या घरी बनवा तांदळाची सोपी क्रिम

Maharashtra Live News Update : कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक, घटना CCTV मध्ये कैद

Sunday Horoscope: कामाचा ताण वाढेल, ५ राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; वाचा रविवारचे राशीभविष्य

मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Viral Video : प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भयंकर घडलं; कॉलेज तरुण स्टेजवर आला अन्...

SCROLL FOR NEXT