Cotton Theft Saam tv
ऍग्रो वन

Cotton Theft : चोरट्यांचा पांढऱ्या सोन्यावर डल्ला; चाळीत ठेवलेला वीस क्विंटल कापूस लंपास

Dhule News : सध्या कापूस कमी दरात विक्री होत असल्याने दर वाढतील; या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता

साम टिव्ही ब्युरो

म्हसदी (धुळे) : कष्टाने पिकविलेले पांढरे सोने अर्थात कापूस पिकावर चोरट्यांची नजर पडली आहे. चोरट्यांनी (Dhule) अनेक शेतकऱ्यांचा कापूस लांबविला असून  ककाणी (ता. साक्री) शिवारात घरापासून हाकेच्या अंतरावरील चाळीतला सुमारे वीस क्विंटल (Cotton) कापूस चोरट्यांनी लंपास केला. (Breaking Marathi News)

ककाणी- म्हसदी रस्त्यावर तरुण शेतकरी मच्छिंद्र साहेबराव बेडसे यांचे शेतातच घर आहे. घरापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर बेडसे यांची कांदाचाळ आहे. चाळीत गोण्यांमध्ये कापूस संग्रही ठेवला होता. सध्या कापूस कमी दरात विक्री होत असल्याने दर वाढतील; या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. परंतु शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कापसावर चोरट्यांनी नजर पडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील महिन्याभरात साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी कापूस चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश शेतकरी कापसाचे वजन घटू नये म्हणून गोण्यांत संग्रही ठेवतात. यापूर्वी काळगाव शिवारात चोरट्यांनी डाळिंब, सीताफळ लंपास केले आहे. आता आजीच्या दशक्रिया विधीसाठी व्यस्त असलेल्या बेडसे बंधूंच्या शेतात चोरट्यांनी धाडस केल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस चोरट्यांचे धाडस वाढत असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT