Rice 
ऍग्रो वन

‘काळा तांदूळ’ तोही साक्रीत; प्रयोगशील शेतकऱ्याने घेतले उत्पन्न

साम टिव्ही ब्युरो

वार्सा (धुळे) : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) नेहमीच उत्पन्नवाढीसाठी विविध प्रयोग करताना दिसतो. असाच प्रयोग देवळीपाडा (ता.साक्री) येथील आनंदा सूर्यवंशी या ५७ वर्षीय शेतकऱ्याने काळ्या भाताची लागवड करून केला आहे. विशेष म्हणजे तब्बल ७० पोती काळा भाताचा वाण त्यांनी आपल्या शेतात पिकविला आहे. या काळ्या भाताची सध्या परिसरात चर्चा आहे. (dhule-news-sakri-Black-Rice-is-also-active-Income-taken-by-experimental-farmers)

काळ्या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो. शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी करता येऊ शकते. असा हा बहुपयोगी काळा भात पिकवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पन्न येते, जे नियमित भात (Rice) पिकापेक्षा कमी आहे. मात्र, या भाताला भाव नियमित मागणी असलेल्या भातापेक्षा चार ते पाचपट अधिक मिळतो. अशा या बहुपयोगी भाताचे उत्पन्न साक्री (Sakri) तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी घेऊ लागला आहे. कृषी क्षेत्रातील हा नावीन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग बनेल, अशी अपेक्षा आहे. सुरवातीच्या काळात काळ्या तांदळाविषयी अनेक गैरसमज होते. इतकेच नव्हे, तर बऱ्याच लोकांना असे वाटले, की काळा तांदूळ आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण बरेच लोक त्याचा नियमित वापर करतात.

बियाण्यासाठी शोधकार्य

मला शेतात काहीतरी नवीन करावेसे वाटले. त्या अनुषंगाने यू-ट्यूबवर शेतात पिकणारे नवीन वाण पाहू लागलो. माझ्या मनात दोन विषय आले, एक म्हणजे काळा भात व दुसरा काळी हळद. मी काळ्या भातचा विषय निवडला व त्यासाठी पंजाबामध्ये बिजवाई (बियाणे) साठी फोन केला. त्यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील राजाराम पाटील या शेतकऱ्याचा फोन नंबर दिला. श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधून दहा किलो काळा भाताचे बिजवाई आणले, त्याचे रोप तयार करून तीन एकरात लागवड केली. यातून ७० पोती काळा धान पिकविला. आयुर्वेदिक काळी हळदीच्या बिजवाईचा शोध सुरू असून, या हळदीचीही निश्‍चित लागवड करणार असल्याचे श्री. सूर्यवंशी म्हणाले.

किंमतही तुलनेने कमी

मोठ्या शहरांमध्ये काळा भात विविध कंपन्यांकडून ऑनलाइन ३९९ रुपये प्रतिकिलोने विकला जातो. मात्र, आनंदा सूर्यवंशी या शेतकऱ्याने हा भात शेणखत टाकून तसेच कमी फवारणी करून पिकविला असताना ते २०० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ स्वरूपात विकणार आहेत. या अवलिया शेतकऱ्याने काळा भाताबरोबरच १०० पोती बासमती भातही पिकवला आहे.

काळ्या तांदळाचे फायदे

लठ्ठपणा कमी होतो, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण, पचन सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते, त्वचा, मेंदू व डोळ्यांसाठी फायदेशीर.

काळा भात या नवीन वाणाच्या लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे व त्यांच्या टीमचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले. घोडदे येथील कृषी सहाय्यक अंजना चौरे यांनीदेखील वेळोवेळी शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन केले. यांच्या सहकार्यामुळेच मी काळा भाताचे विक्रमी उत्पादन घेऊ शकलो.

-आनंदा सूर्यवंशी, शेतकरी, देवळीपाडा (ता. साक्री)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT