Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Onion : शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडतोय; शेतकऱ्याने फेकला २५ क्विंटल कांदा, भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

Dhule News : गतवर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा लागवड वाढली होती. मात्र कांदा काढणीनंतर कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भूषण अहिरे

धुळे : कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेड मधला कांदा उकिरड्यावर फेकला आहे. धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला आहे. 

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी सद्यस्थितीला कांदा विक्री न करता साठवणूक करून ठेवत आहे. मात्र शेडमध्य साठवणूक करून ठेवलेला कांदा देखील आता सडू लागला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. अर्थात एकीकडे भाव नाही तर दुसरीकडे कांदा खराब होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल; या आशेपोटी शेतकरी दिनेश पाटील यांनी चार महिन्यापासून १०० क्विंटल पेक्षा जास्त कांदा शेडमध्ये साठवून ठेवला होता. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यापासून कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे कांदा शेडमध्येच खराब होण्यास सुरुवात झाली. यामुळे काही कांदा पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे मजबुरीने विक्री करावा लागला. परंतु त्यापेक्षा कांद्याला जास्तीचा दर मिळाला नाही आणि त्यामुळे उर्वरित कांदा चाळीमध्येच खराब होऊ लागला.  

शेतकरी चिंतेत 

साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने २० ते २५ क्विंटल कांदा उकीरड्यावर फेकण्याची वेळ शेतकरी दिनेश पाटील यांच्यावर आली. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कांद्याला तीन हजार पर्यंतचा दर मिळत होता. या अपेक्षेनेच या वर्षी देखील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र पाचशे ते आठशेचा भाव कांद्याला मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT