Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : बोगस बियाणे व वाढीव दराने खते, बियाणे विक्री; धुळे जिल्ह्यातील ४ कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द

Dhule News : शेतकऱ्यांची खत आणि बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही कृषी विक्रेते बोगस खते आणि जादा दराने बियाणे विक्री करतात.

भूषण अहिरे

धुळे : कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच कृषी केंद्रांवर नजर आहे. प्रामुख्याने बोगस बियाणे तसेच जादा दराने खतांची व बियाणांची विक्री करणाऱ्यांवर लक्ष आहे. तरी देखील जादा दराने विक्री सुरु असल्याचे प्रकार समोर आला असून धुळे जिल्ह्यातील अशा ८ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून चार केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. 

सध्या पेरणीचा हंगाम सुरु आहे. या काळात शेतकऱ्यांची (Farmer) खत आणि बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही कृषी विक्रेते बोगस खते आणि जादा दराने बियाणे विक्री करतात. दरवर्षी या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. त्यानुसार कृषी विभागाचे (Agriculture Department) लक्ष असते. यावर्षी कृषी विभागाने कडक पाऊले उचलली असून अशा विक्रेत्यांविरुध्द मोहीम उघडली आहे.

८ कृषी केंद्रावर कारवाई 

बोगस खत आणि जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या ४ कृषी केंद्राचे परवाने कायम स्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तर ४ कृषी केंद्राचे परवाने ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी साहित्यांची विक्री करता येणार नाही. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जादा दराने बियाणांची व खतांची विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दनाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

Maharashtra Live News Update: यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोघांना अटक, हेरॉईन जप्त

शिवजयंतीत तणाव! शिवप्रेमी-पोलिसांमध्ये बाचाबाची; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT