Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule : धुळ्यात सलग तीन दिवसांपासून पारा ४२ अंश पार; वाढत्या तापमानाचा दूध उत्पादकांना फटका

Dhule News : राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळ्यात देखील तापमान वाढीचा कहर सुरु आहे. तापमान वाढीमुळे याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर देखील होताना दिसून येत आहे

भूषण अहिरे

धुळे : राज्यात उन्हाचा कडाका अनुभवण्यास मिळत आहे. तर धुळ्यात सलग तीन दिवसांपासून तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद केली जात आहे. या तापमान वाढीचा फटका आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कारण वाढत्या उन्हामुळे दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरच परिणाम होऊ लागला असून जनावरांची दूध देण्याची क्षमता घटू लागली आहे. 

राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळ्यात देखील तापमान वाढीचा कहर सुरु आहे. तापमान वाढीमुळे याचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर देखील होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरच याचा परिणाम होऊ लागला असून जनावरांची दूध देण्याची क्षमता घटू लागली आहे. त्यामुळे दुध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने आता शेतकऱ्यांसमोर वाढत्या तापमानाचे देखील संकट उभे ठाकले आहे.  

अवकाळीनंतर तापमानवाढीचे संकट 

अवकाळी पावसामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून आता ज्या दुभत्या जनावरांच्या दुधावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यावर देखील आता वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन दुधात घट येत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. 

पशुसंवर्धन विभागाकडून सूचना 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यासंदर्भात शेतकऱ्यांना वाढत्या तापमानापासून आपल्या दुभत्या जनावरांच संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातत्याने थंड आणि शुद्ध पाणी जनवरांना पाजावे. तसेच थंडावा असेल अशा ठिकाणी या जनावरांना बांधण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अर्थात कृषी संवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करून आपल्या दुभत्या जनावरांचा वाढत्या तापमानापासून बचाव शेतकऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ear health awareness: सततचा गोंगाट ठरतोय धोकादायक! शहरातील आवाजामुळे कमी होतेय ऐकण्याची क्षमता

Maharashtra Live News Update : पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

Blood Pressure Control: BP नियंत्रणात ठेवायचाय? हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? 'ही' ४ फळं खायला करा सुरू, डॉक्टरांनी दिली महत्त्वाचा सल्ला

Sunscreen Using Tips: सनस्क्रिन रोज लावयची की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT