Onion Crop Saam tv
ऍग्रो वन

Climate Change Impact: हरभरा, कांदा पीक धोक्यात; हवामान बदलाचा परिणाम

Dhule News : हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल देखील झाल्याचे दिसून आले

भूषण अहिरे

धुळे : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडी तर कधी अवकाळी (Dhule) पाऊस यामुळे वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम पिकांवर होताना दिसून येत आहे. यात हरभरा व कांदा पीक (Onion Crops) धोक्यात आले आहे. (Maharashtra News)

हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल देखील झाल्याचे दिसून आले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी पिकाची आशा शेतकऱ्याला (Farmer) आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे हरभरा व कांदा पिकावरील प्रादुर्भाव वाढतच असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण त्याचबरोबर सकाळी पडणारे धुके व अचानक काही वेळासाठी रिमझिम होणारा पाऊस या सर्वांमुळे हरभरा पिक व कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीक वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT