कपाशी 
ऍग्रो वन

पांढरे सोने काळवंडले; काढणीला आलेल्या कपाशीला पावसाचा फटका

पांढरे सोने काळवंडले; काढणीला आलेल्या कपाशीला पावसाचा फटका

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अधून मधून होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्‍या कपाशीच्या पिकाला बसला आहे. (dhule-news-cotton-White-gold-blackened-Rains-hit-the-harvested-cotton)

सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेरणी केलेले पिक जगवण्याच मोठे आव्हान उभे ठाकले होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी कसबस हे पीक जगवले. परंतु त्यानंतर कपाशी पिक काढणीला येण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हे पांढरे सोन पूर्णपणे काळवंडल आहे.

व्यापाऱ्यांकडूनही घेण्यास नापसंती

काढणीला आलेला कापूस पावसामुळे ओला झाल्यामुळे या कापसाला बाजारामध्ये भाव मिळत नाही. व्यापाऱ्यांनी देखील या कापसाला घेण्यास नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे मोठा खर्च करून व मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकावर पावसाचे पाणी फेरल्यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांना हवी मदत

या काळवंडलेल्या कपाशी पिकाच करायचे काय? असा प्रश्न या शेतकर्‍यासमोर उभा ठाकला आहे. तरी कृषी विभागाने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT