Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv News : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद

Dharashiv News : शेतकऱ्यांना पीक कर्जाची समस्या येत आहे. चांगले उत्पन्न मिळत नसल्यामुळे कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, दुधाला दर वाढवून द्यावा; यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धाराशिवमध्ये  राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

शेतकऱ्यांना (Farmer) पीक कर्जाची समस्या येत आहे. चांगले उत्पन्न मिळत नसल्यामुळे कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. तसेच गाईच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर भाव द्यावा. जाहीर केलेले दुधाचे ५ रुपये अनुदान फेब्रुवारीपासुन लागु करावे, शेतकऱ्यांना पिककर्ज (Crop Loan) वाटप न करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, कारखान्याकडील ऊसाचे थकीत बिल शेतकऱ्यांना तातडीने द्यावे; यासह शेतीवरील संपुर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

विमा कार्यालय फोडण्याचा इशारा 

आंदोलनाच्या (Dharashiv News) पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. दरम्यान शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास व शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात विमा न दिल्यास मुंबईतील विमा कंपनीचे कार्यालय फोडु; असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे नेते दुधगावकर यांनी दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दिल्ली प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT