कर्जाला कंटाळून विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू...  अभिजीत घोरमारे
ऍग्रो वन

कर्जाला कंटाळून विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू...

कर्जाला कंटाळून विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात राजनी येथे घडली आहे.

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे
भंडारा: कर्जाला कंटाळून विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा Farmer अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर Lakhandur तालुक्यात राजनी येथे घडली आहे. मधुकर महादेव ठाकरे (वय 57) रा. राजनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हे देखील पहा -

सबंधित मृतक शेतकरी तालुक्यातील राजनी Rajani येथील रहिवासी होता. त्यांच्यावर बँक, पतसंस्था व खाजगी असे एकूण मिळून जवळपास सहा लाखाचे कर्ज आहे. या कर्जाला कंटाळून मृतकाने गत 18 जुलै रोजी राहत्या घरी विषप्राशन केले होते. संबंधिताच्या विषप्राशनाची Poison घटना घरातील अन्य सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधिताला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र रुग्णाची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात Hospital हलविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपूर Nagpur येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तिथे देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर आठवडाभरानंतर त्याची मृत्यूशी असलेली झुंज संपली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृतकाच्या मागे पत्नी व 25 वर्षीय अविवाहित एक मुलगा आहे. मृत शेतकऱ्याचे कर्ज Debt माफ करून त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT