akola, dhaigoan gawande saam tv
ऍग्रो वन

Akola : अज्ञात आजाराने शेळ्यांचा मृत्यू; पशुवैद्यकीय दवाखान्यास कुलूप, दहिगाव गावंडे ग्रामस्थ संतप्त

गेल्या महिन्यापासून पशुवैद्यकीय विभाग कुलुपबंद अवस्थेत आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (akola) दहिगाव गावंडे गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात आजाराने शेळ्यांचा मृत्यू होत आहे. गावातील सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने गावकरी त्रस्त झाले. गरीब गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गावातील गजानन फरकुंडे यांच्या आतापर्यंत तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे गावात या जनावरांना वेगवेगळ्या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. जनावराना वेळेवर पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने प्राण गमवावा लागत आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुसेवा या परिसरातील लोकांच्या जनावरांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महिन्यापासून एकही पशुवैद्यकीय डॉक्टर हजर नाही.

तरी प्रशासनाने दखल घ्यावी एक डॉक्टरला चार गावाचा कार्यभार असल्यामुळे त्या डॉक्टरची भेट सुद्धा होत नाही. त्यामुळे शेळ्यांना जीव गमवावा लागला असा आरोप गजानन फरकुंडे यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT