खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा; दादा भुसे यांचे मनसुख मांडविय यांना पत्र Saam Tv
ऍग्रो वन

खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा; दादा भुसे यांचे मनसुख मांडविय यांना पत्र

रब्बी हंगामामध्ये अनुकूल हवामानाने महाराष्ट्रात लागवड योग्य क्षेत्र वाढले

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: रब्बी हंगामामध्ये अनुकूल हवामानाने महाराष्ट्रात (Maharashtra) लागवड योग्य क्षेत्र वाढले आहे. यामुळे खताची (Fertilizer) मागणी देखील वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना (farmers) परवडणारे नाही. यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहिले आहे.

रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे (weather) महाराष्ट्र राज्याचे लागवडी योग्य क्षेत्र वाढले असल्यामुळे खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्यामुळे एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यामध्ये (state) अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.

हे देखील पहा-

याप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या भावाचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या भावातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. खत उत्पादकांनी राज्यामध्ये ०६ डिसेंबर, २०२१ दिवशी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा (Supply) राखण्याकरिता आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्याकरिता आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय भाव आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे आहेत.

(कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)

१०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.

१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये.

१६:२०:०:१३ - १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये.

अमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५.

१५:१५:१५:०९ - ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ:१९५.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT