Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री; खरेदी केंद्र सुरु नसल्याने आर्थिक नुकसान

Chandrapur News : हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री; खरेदी केंद्र सुरु नसल्याने आर्थिक नुकसान

संजय तुमराम

चंद्रपूर : सोयाबीन पिकाला सरकारने हमी भाव घोषित केला आहे. मात्र हमीभावाने खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्रच अद्याप सुरु झाले नसल्याचे चित्र (Chandrapur) चंद्रपूर जिल्ह्यात आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे (Farmer) शेतातून काढून घरात आणलेल्या सोयाबीनची विक्री कोठे करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.  (Breaking Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. दोन लाख हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने सोयाबीनला ४ हजार ४५० रुपये एवढा हमी भाव जाहीर केला. मात्र त्या भावाने खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने केंद्र उघडलेच नसल्याने सोयाबीन विकावा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाईलाजाने जावे लागतेय व्यापाऱ्यांच्या दारात 

आता सोयाबीन पीक हाती आले आहे. पण हमी भाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांच्या दारात जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा उचलत व्यापारी पाहिजे त्या किमतीत सोयाबीन घेत आहेत. यात शेतकरी नाडला जात आहे. हमी भावापेक्षा तब्बल पाचशे रुपये कमी भावात माल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठी हमी भाव केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT