Farmer Rasta Roko Saam tv
ऍग्रो वन

Farmer Rasta Roko : कापूस मोजणी करताना वजनात तफावत; संतप्त शेतकऱ्यांचा जिनिंगविरोधात चक्काजाम

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिम्परी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगमध्ये हा प्रकार उघड झाला कापसाला भाव मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकरी जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आणू लागला आहे

संजय तुमराम

चंद्रपूर : कापसाला व्यापाऱ्यांकडून अगोदरच चांगला भाव दिला जात नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे अनेक शेतकरी हे जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आणत आहेत. मात्र जिनिंगवर कापूस खरेदी करताना वजनात तफावत आढळून आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर आंदोलन करत चक्काजाम आंदोलन केले. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिम्परी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगमध्ये हा प्रकार उघड झाला आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकरी जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आणू लागला आहे. मात्र याठिकाणी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. वृंदावन जिनींगमध्ये कापूस विक्रीकरिता आलेल्या शेतकऱ्यांना धर्मकाट्यावर मोजमाप करताना तब्बल दीड क्विंटल कापसाची अफरातफर केली जात असल्याचा प्रकार लक्षात आला. 

कापूस खरेदी पडली बंद 

जिनिंगमध्ये आलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच शेकडो शेतकरी एकत्र आले. यानंतर जिनिंग विरोधात शेतकऱ्यांनी अहेरी- चंद्रपूर या महामार्गावर ठिय्या मांडत चक्काजाम केला. जिनिंगवरील कापूस खरेदी बंद पाडून आंदोलन सुरू केले. यामुळे तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प पाडली. तर जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

लातूर बाजार समितीमधील शेतमालाचे सौदे अचानक बंद
लातूर
: बीड येथील संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी अचानक लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाचे सौदे बंद करत बाजार समिती बंद करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. यामुळे सौदे बंद करण्यात आले होते. परिणामी शेतमाल घेऊन आलेल्या काही शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

Bribe Case : सरकारी कामासाठी लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, ठाण्यात खळबळ

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

SCROLL FOR NEXT