- कृषिमंत्री दादाजी भुसे Saamtv
ऍग्रो वन

जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा

- कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली केंद्र सरकारकडे मागणी

संदीप भुजबळ

मुंबई : राज्यासह देशभरात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातच सोयाबीनचे मोठे क्षेत्र असून महाराष्ट्र हे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे देशातील सर्वात मोठे राज्य असून ४५ लक्ष हेक्टर सोयाबीनचे उत्पादन एकट्या महाराष्ट्र्र राज्यात होते. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील हे पीक आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. यावर्षी देखील सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या बाजारात नवीन सोयाबीनची आवक होण्यास सुरूवात झाली असतानाच नेमक्या याचवेळी हा आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय झाल्यानंतर लागलीच सोयाबीनचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी पडल्याने कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जीएम सोयाकेक आयातीच्या निर्णयामुळे देशातील सोयाबीनच्या दराला मोठा फटका बसणार असून त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. एकीकडे जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनास केंद्र सरकारने देशात अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, परदेशातील जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिलेली आहे. केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीयमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रान्वये केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT