Jalna: शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक Saam Tv
ऍग्रो वन

Jalna: शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

परतूर तालुक्यातील वाढोणा गावातील घटना

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: रात्री उशिरा शाॅर्ट सर्किट होऊन ५ एकर ऊसाला आग लागून ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Partur) तालुक्यातील वाढोणा गावात (village) घडली आहे. वाढोणा शिवारातील गटनंबर 62 मध्ये भागुबाई जनार्दन शेळके आणि बाळासाहेब तनपुरे या शेतकऱ्याच्या शेतात ५ एकर ऊसाची लागवड असलेल्या शेतात रात्री अचानक शेतावरून गेलेल्या महावितरणच्या (MSEDCL) विजेच्या तारेवर शाॅर्ट सर्कीट झाले.

हे देखील पहा-

यामुळे ऊसाच्या शेतीला (agriculture) आग लागली. त्यात भागुबाई जनार्दन शेळके यांचा अडीच एकर तर बाळासाहेब तनपुरे यांचा अडीच एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी (farmers) यावेळी केली आहे. महावितरणच्या गलथान काराभरमुळे ऊस जळाल्याचा आरोप ही शेतकऱ्याकडून केला जात आहे.

या भागात विहीर काठावर अनेक विद्युत पंप असल्यामुळे ताराचे जाळे पसरले आहे. तारा जीर्ण झाल्याने खाली आल्या आहेत. शिवाय, अनेक रोहित्रांवर जुने फ्युज आणि इतर सामान असल्याने अनेकदा शार्टसर्किट होते. बुधवारी अचानक उसातून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. तेव्हा परिसरातील शेतकरी जमा झाले.

मात्र, आगीची दाहकता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. ऊस आणि उसाचे पाचट लवकर पेट घेते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ जवळ असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्ष भर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

SCROLL FOR NEXT