Buldhana News Crop Insurance
Buldhana News Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: शेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्‍यापासून वंचित; कोट्यावधी रुपयांचा पीकविमा बाकी

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीकविम्याची रक्कम मिळण्यापासून वंचित आहेत. पिक विम्‍यासाठी प्रत्येक तालुक्यातील शेकडो शेतकरी (Farmer) जिल्हा कचेरीच्या पायऱ्या झिझवत आहेत. मात्र अद्यापपर्यंत पीकविम्याची (Crop Insurance) रक्कम न मिळाल्याने शेतकरी वंचित आहेत. (Tajya Batmya)

खरीपाचा हंगाम सुरु होत आहे. शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी खत बियाने घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. शेतकरी क्रांती संघटनेच्यावतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांनी धडक देत पीकविम्याच्या रकमेची मागणी केली आहे. शेगाव (Shegaon) तालुक्यातील हजारो शेतकरी या पीकविम्याच्‍या रक्‍कमेपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

तर त्‍यांना चोप देऊ

नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन शेतकरी शेगावकडे निघून गेले आहे. सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता जर दहा दिवसात पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. तर अधिकारी व पीकविमा कंपनीच्या कर्मचार्यांना चोप देऊ असा इशारा शेतकरी क्रांती संघटनेचे गजानन बोलेवार यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: सहानभुतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

SCROLL FOR NEXT