Khamgaon Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Khamgaon Heavy Rain : खामगाव तालुक्यात अतिवृष्टी; शेतातील पिके गेली वाहून, शेताला तलावाचे स्वरूप

Buldhana News : राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने मुंबई, रायगड भागात कालपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संजय जाधव

बुलढाणा : राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात देखील रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने मुंबई, रायगड भागात कालपासून (Heavy Rain) जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस आता सक्रिय झाला असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने शेतकऱ्यांची (Farmer) दैना उडाली आहे. 

जिल्ह्याला येलो अलर्ट 

आठवडाभरानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार मुसळधार पाऊस पडत आहे. खामगाव तालुक्यातील आवार, हिवरखेड, पोरज, कॉन्टी या गाव शिवरातील शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा निसर्गाचा कोप म्हणावा लागेल. त्यामुळे बळीराजा पुन्हा चिंतेत आहे. शेत पिकाच मोठ नुकसान होत असल्याचे चित्र आहे. खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT