Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; मका, ज्वारीचे नुकसान

Buldhana News : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बीड, अकोला, अमरावती, संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.

संजय जाधव

बुलढाणा : मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Rain) झाला. यात आज दुपारी मोताळा तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये (Buldhana) तालुक्यातील बोराखडी, अंत्री, पुन्हई यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील (Beed) बीड, अकोला, अमरावती, संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी गारपीट व पाऊस देखील आला आहे. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी. मका. बाजरी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर ज्वारी काढणीला आली असताना वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. यामुळे (Farmer) शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोताळा तालुक्यात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतातील मका व ज्वारीचे पीक पूर्णपणे जमिनीवर झोपले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून प्रशासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी; अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT