Bogus Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds: बियाणे कंपनीने केली शेतकऱ्याची फसवणूक; ८० दिवसातच निघाले धान

Bhandara News : बियाणे कंपनीने केली शेतकऱ्याची फसवणूक; ८० दिवसातच निघाले धान

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. बियाणे विक्रेत्यांकडून होत असलेली (Bhandara) फसवणूक हि नित्याचीच राहिली आहे. असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे समोर आला आहे. शेतकऱ्याला (Farmer) बियाणे कंपनीने फसवले असुन १४० दिवसात निघणारे धान ८० दिवसात निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Latest Marathi News)

मोहाडी तालुक्यांतील जांभोरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर समरित यांच्याकडे २ एकर शेती आहे. दरवर्षी त्यांच्या शेतात १४० दिवसात निघणारा धान लागवड करतात. या वर्षी देखिल त्यांनी पालोरा येथील कृषि केंद्रातून १४० दिवसांत निघणार बायर कंपनीचा ६४४४ गोल्ड वाणाचा बियाणे खरेदी केले. पेरणी करुण (Bogus Seeds) धान लागवड देखील केले. हे धान १४० दिवसात निघेल असे शेतकऱ्यांना माहिती होती. पण हे धान ८० दिवसातच निघाल्याने शेतकऱ्याना मोठा प्रश्न पडला आहे. 

शेती पाण्याखाली असल्याने.. 

समरित यांच्या शेती परीसरात तलाव असल्याने परिसरातील शेती नेहमी पाण्याखाली असते. त्यामुळे सर्व शेतकरी १४० दिवसात निघणारा धान लागवड करतात. पण लागवड केलेले धान ८० दिवसात निघाल्याने १० दिवसात हाच धान कापणीला येणार आहे. परंतु शेतात पाणी असल्याने धान कापायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या शेतात शेती पिकली खरी पण हातात अन्नाचा दाना येणार नाही. त्यामुळे आता बायर कंपनीने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT