Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्जबाजारीपणाला कंटाळून उचलले पाऊल

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : शेतात पेरणी करूनही उत्पन्न मिळत नाही. पावसाचा लहरीपणा, अवकाळी पावसाने शेतातील (Bhandara) पिकाचे नुकसान होत असल्याने उत्पन्न मिळत नाही. यामुळे वाढलेल्या कर्जाच्या बोजाखाली शेतकऱ्याने (Farmer) जीवनयात्रा संपविली. लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथे ही घटना उघडकीस आली.  (Breaking Marathi News)

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील शेतकरी प्रेमदास रामा मेश्राम वय (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रेमदास मेश्राम यांच्याकडे ०.४० आर इतकी शेत जमीन आहे. त्यावर ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. शेतातून उत्पन्न घेण्यासाठी वाट्टेल तितका खर्च केला. परंतु अपेक्षित असे उत्पन्न मिळाले नाही. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात घाट आली. शिवाय भाव मिळत नसल्याने संकट होते. या सततच्या नापिकीतून प्रेमदास मेश्राम यांनी टोकाचे पाऊल उचलले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोक्यावर कर्जाचा डोंगर 

पावसाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी होती. यामुळे शेतीसाठी कर्ज देखील घेतले होते. उत्पन्न न आल्याने कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून मौजा मिरेगाव येथील शेतकऱ्याने शेतातीलच झाडाला नायलान दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT