Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांने संपविले जीवन

Bhandara News : गावशिवारातच त्यांची शेती होती. शती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता भेडसावत होती. यातूनच शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे. 

प्रदीप रामचंद्र दोनाडकर (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मेंढा पोहरा येथील हा शेतकरी होता. गावशिवारातच त्यांची शेती होती. शती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उत्पन्न नसल्याने शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता प्रदीप दोनाडकर यांना होती. 

या चिंतेतूनच प्रदीप यांनी कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. शेतकऱ्याचा (Farmer) मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT