Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : पारंपरिक धान शेतीला फाटा; तिखट मिरची उत्पादनातून केली कमाल, शेतकरी झाला मालामाल

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथील लेकराम चौधरी या शेतकऱ्याने कमी पाणी आणि कमी खर्चात मिरचीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: पारंपारिक धानशेतीला फाटा देत शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी आता शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या मिरचीची शेती करत आहेत. (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात येत असलेल्या किटाडी येथील शेतकरी (Farmer) लेकराम चौधरी यांनी देखील पारंपारिक शेतीला फाटा देत मिरचीची शेतीचा पर्याय निवडला आहे. आता या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. तिखट मिरचीने आता लेकराम यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. (Live Marathi News)

भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथील लेकराम चौधरी या शेतकऱ्याने कमी पाणी आणि कमी खर्चात मिरचीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. लेकराम यांचा धानाच्या पट्ट्यात मिरची शेतीतील यशस्वी प्रयोग करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. किटाडी येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या पारंपरिक धानाची शेती करतात. मात्र, या शेतीतून हवा तेवढा नफा मिळत नाही. त्यात नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. याला पर्याय म्हणून कमी पाण्याची व कमी खर्चाच्या शेतीसाठी लेकरामने मिरचीच्या शेतीचा वेगळा पर्याय शोधला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८ लाखाचे उत्पन्न 

सव्वा एकर जागेत मिरचीची लागवड केली. यातून त्यांना तब्बल आठ लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले असून तिखट मिरचीने त्यांच्या जिवनात गोडवा निर्माण केला आहे. तर आता मिरची उत्पादनातून भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी लेकराम चौधरी हे इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडे न वळता बागायती शेती करावी असे आवाहन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT