चक्रीवादळाने भंडारा जिल्ह्यातील धान जमीनदोस्त; शाहीन वादळाचा तडाखा? अभिजात घोरमारे
ऍग्रो वन

चक्रीवादळाने भंडारा जिल्ह्यातील धान जमीनदोस्त; शाहीन वादळाचा तडाखा?

भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) काही तालुक्याला चक्रीवादळाचा (Shaheen Cyclone) तड़ाखा बसला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) काही तालुक्याला चक्रीवादळाचा (Shaheen Cyclone) तड़ाखा बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाड़ी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान जमीनदोस्त झाले असून तोंडातला घास हिरावला गेला आहे. त्यांमुळे जिल्ह्यात शाहीन वादाळाचा तडाखा बसला असल्याची चर्चा रंगु लागली आहे. आता तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे. काल रविवारी सायंकाळी चार वाजता पासून सलग एक-दीड तास पावसासह आलेल्या चक्रीवादळाने तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेले धानाचे पीक जमीनदोस्त केले आहे.

मोहाडी व तुमसर तालुक्यात येणाऱ्या निलज बु. निलज खुर्द, देव्हाडा बु. देव्हाडा खुर्द, चारगाव, ढोरवाडा, मोहगाव, मनोरा, नवेगाव बु., करडी, मुंढरी, पालोरा, खडकी, पांजरा, बोरी, मांढळ, पांजरा व इतर गावांमध्ये चक्रीवादळासारख्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे धानाचे पीक नष्ट झालेले आहे. यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका निलज बु. करडी व देव्हाडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे, तर करडी परिसरातील रस्त्यांवर व शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ मोठे झाडे पडलेले पाहायला मिळत आहे. याआधी तुडतुडा मावा यांसारख्या धान पिकासाठी घातक किडीचा प्रादुर्भाव धानावर झाला होता, त्याने शेतकरी आधीच हतबल झाला होता.

मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च खतांचा खर्च इत्यादी खर्च करून-करून शेतकऱ्याचे आधीच कंबरडे मोडले होते, अशात रविवारी सायंकाळी आलेले चक्रीवादळ व पावसामुळे शेतकऱ्याच्या ओल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी करडी, निलज बु. देव्हाडा बु. व परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा केला होता, परंतु वैनगंगेला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे धानाचे पीक खराब होऊनही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे या वर्षी तरी शासन माय-बापाने शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी व स्थानिक लोक प्रतिनिधींना पाठवून आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

SCROLL FOR NEXT