Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : वादळी वाऱ्याचा तडाखा; बीडच्या भाळवणी गावातील २५ घरांचे छत उडाले, आवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान

Beed News : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. आज देखील बीडच्या आष्टी तालुक्यातील भाळवणी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला

विनोद जिरे

बीड : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान अजूनही सुरूच आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जिरदार पाऊस (Rain) झाला. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. (Breaking Marathi News)

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. आज देखील बीडच्या आष्टी (Ashti) तालुक्यातील भाळवणी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे (Farmer) प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या राहत्या घरावरील छत कोसळले आहेत. तर पत्रे देखील उडून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे गावातील जवळपास २५ घरावरील पत्रे उडून गेले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भरपाईची मागणी 
दुसरीकडे शेतातील फळबाग उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळं शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

SCROLL FOR NEXT