विनोद जिरे
ऍग्रो वन

'...तर नुकसानीची शक्यता'; बीड कृषी विभागाचे शेतकर्‍यांना आवाहन

बीड जिल्ह्यात आठ लाख हेक्‍टरवर होणार खरिपाची लागवड - जेजुरकर

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: राज्यभर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी (Sowing) लगबग सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालाय. मात्र शेतकऱ्यांनी थोडासा पाऊस झाला, की पेरणीसाठी घाई करू नये. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय एकाही शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. जर पेरणी केलीच तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर जमिनीत ओल नसल्याने, पीकं देखील उगवून येणार नाहीत. असं आवाहन बीडचे कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर केले आहे.

बीड जिल्ह्यातील (Beed) काही भागांमध्ये पावसाने आगमन केलं आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 38 मिलिमीटर पाऊस (Rain) झालाय. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी खरिपासाठी लगबग तर सुरू केलीय. मात्र पेरणी ही पुरेसा पाऊस होईपर्यंत करू नये. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. त्याचबरोबर जमिनीत किमान 6 इंचापर्यंत ओल असावी. जेणेकरून आपलं पीक बहर घेईल आणि उत्पन्नात देखील वाढ होईल. असं आवाहन आणि माहिती बीड जिल्ह्याचे कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली आहे.

हे देखील पाहा-

ते म्हणाले की, जमिनीत कमी ओल असल्याने, शेतकर्‍यांनी पेरणी केली तर ते बियाणे उगवणार नाही आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी तर येतीलच मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं. यंदा जिल्ह्यात जवळपास 8 लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेऊनच पेरणी करावी, असे देखील जेजुरकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Water Benefits: त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर बडीशेपचे पाणी, असा करा सोपा पद्धतीने वापर

नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवरच मारली उडी! पत्नीसोबत पुढे काय झालं? व्हिडिओ व्हायरल

भाजपला मोठा धक्का, उमेदवारी नाकारल्याने गडकरींचे खंदे समर्थक बंडाच्या तयारीत, पदवीधरमध्ये मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: पितळेचे ‘सोन्याचे बिस्कीट’ देऊन महिलेचे तीन तोळे दागिने लुबाडले; आरोपी बीडमधून अटक

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

SCROLL FOR NEXT