mouth to foot disease, buldhana news, saam tv
ऍग्रो वन

Cold Wave : थंडीमुळे जनावरांना 'या' राेगाची लागण, शेतकरी धास्तावले; राज्यभरातील दूध उत्पादनावर परिणाम

वातावरणातील या बदलामुळे जनावरांनी अन्न खाणे बंद केले आहे.

संजय जाधव

Mouth to Foot Disease : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेला आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे. आधीच लंपीमुळे ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे (cold) वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे आणि यामुळे मात्र पशुपालक अजूनही त्रस्त होताना दिसत आहे. (Maharashtra News)

सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे व कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये " फूट अँड माऊथ डिसीज " अर्थात तोंडखुरी व पायखुरी (mouth to foot disease) असे विषाणूजन्य आजार हाेत आहे. लंपी नियंत्रणात येतो न येतो तोच आता पशुपालक धास्तवले आहेत.

वातावरणातील या बदलामुळे जनावरांनी अन्न खाणे बंद केले आहे. काहींचा मृत्यू हाेत आहे. यामुळे मात्र राज्यभरातील दूध (milk) उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर आता कुठे नियंत्रणात आलेला लंपी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशु वैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे.

त्यामुळे अशा आजारांपासून आपल्या प्राण्याला (animal) वाचविण्यासाठी बाधित जनावारांचं विलगिकरण करून लसीकरण करावे. त्याबाबतचे आवाहन बुलढाण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र पाटील यांनी देखील केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ तो बडा होने वाला है'; अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची ५० मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT