Cotton  Saam tv
ऍग्रो वन

Cotton : अमरावती जिल्ह्यात साडेसात लाख क्विंटल कापूस खरेदी; शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षाच

Amravati News : सततच्या पावसामुळे कापसाचे उत्पादनात घट झाली होती. यामुळे यंदा बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र कापूस प्रतिक्विंटल ७५०० रुपयांच्या वर गेला नाही

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : खरिपातील मुख्य पीक असलेल्या कापसाची आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख क्विंटलची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे. यावर्षी जिल्ह्यात पिकलेल्या एकूण कापसापैकी जवळपास ६५ ते ७० टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. आतापर्यंत कापूस भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मात्र निराशाच झाली आहे. 

गतवर्षी कापसाच्या दरात वाढ झालीच नव्हती. तरी देखील यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. तर सततच्या पावसामुळे कापसाचे उत्पादनात घट झाली होती. यामुळे यंदा कापसाचा दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्याचा कापूस बाजारात आल्यापासून खासगी बाजारात अजूनही कापूस प्रतिक्विंटल ७ हजार ते ७५०० रुपयांच्या वर गेलेला नाही. 

मार्चपर्यंत कापसाचे भाव जैसे थे 

दरम्यान शुक्रवारी येथील खासगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार २०० सर्वाधिक भाव मिळाला. तर चार वर्षांपूर्वी अमरावतीतच कापसाला प्रतिक्विंटल १२ ते १३ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा कापूस निघाल्यानंतर सुरुवातीपासूनच कापसाचे भाव सात हजार पाचशे रुपयांवर गेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्च महिन्यात भाववाढीची अपेक्षा होती. मात्र आता मार्च महिन्यातील पहिला आठवडा संपला तरीही भाव वाढले नाही. 

शेतकऱ्यांची निराशा 

कापूस काढणीला सुरवात झाल्यापासून शेतकऱ्यांना कापसाच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. यामुळे शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक करून ठेवली होती. भाववाढ होत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्री करून टाकली होती. तर काहींनी अजूनही साठवून ठेवले आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत अर्धाहून अधिक कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT