Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५७ कोटींचा निधी; अमरावती जिल्ह्यात वाढीव निकषाने मिळणार मदत

Amravati News : नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस राज्यातील अनेक भागात झाला होता. याचा फटका शेतातील पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या अवकाळी पावसाने झाले होते

Rajesh Sonwane

अमर घटारे

अमरावती ; यंदा अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात नुकसान केले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार (Amravati) अमरावती जिल्ह्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या (Farmer) शेतकऱ्यांसाठी ३५७ कोटीचा निधी मंजूर झाला असून वाढीव निकषाने शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.  (Latest Marathi News)

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस (Rain) राज्यातील अनेक भागात झाला होता. याचा फटका शेतातील पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या अवकाळी पावसाने झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र नुकसानीच्या दृष्टीने मिळणारी मदत ही कमी असल्याने वाढीव निकषाप्रमाणे मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने ३ लाख २२ हजार ९४४ शेतकऱ्यांच्या २ लाख ६ हजार २६५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले होते. यासाठी वाढीव निकषाप्रमाणे ३५७.९५ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला असून या निधीला मान्यता सुद्धा मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी जिल्ह्याला अपुरा निधी मिळाल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत या निधीचा पाठपुरावा करून याची मागणी केली असता वाढीव निकषाप्रमाणे आता शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT