अमरावती बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी १०,२५० रुपयांचा भाव आवक घटून मागणी वाढल्यामुळे हा भाव मिळाला आहे.
ऍग्रो वन

अमरावती बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी १०,२५० रुपयांचा भाव

आवक घटून मागणी वाढल्यामुळे हा भाव मिळाला आहे.

अरुण जोशी

अमरावती: सोयाबीनला आतापर्यंतचा सर्वाधिक ९,२०० ते १०,२५१ रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. जाहीर हमीभावा पेक्षा मिळालेला भाव कितीतरी जास्त आहे. या विक्रमी भावाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही. हा माल सधन शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अमरावती बाजार समितीच्या माहितीनूसार सोमवारी ९४९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. याशिवाय मंगळवारी ८३५ क्विंटलची सोयाबीनची आवक झाली. यामध्ये ८,७०० ते ९,७०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. याशिवाय हरभऱ्याची ९८४ क्विंटल आवक झाली व ४,५०० ते ४,९०० रुपये असा भाव मिळाला आहे. तुरीची १.९७३ क्विंटल आवक झाली ६.००० ते ६.३०० रुपये असा भाव मिळाला आहे. सध्या शेतमालाची आवक कमी झालेली आहे. दोन महिन्यात नव्या होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एका बाजूला पिकांना चांगला भाव मिळत असताना पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी मात्र पावसाने हवालदिल झाला आहे. तर महाराष्ट्रात काही भागात काही ठिकणी तर म्हणावा तसा पाऊस झालेला दिसत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. मागच्या काही दिवसा कोल्हापूर, सांगलीमध्ये पुरामुळे सर्व शेतजमिन पाण्याखाली गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुबार, तिबार पेरण्यांचं संकट उभं राहिलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT