Akola News Saam Tv
ऍग्रो वन

अकोला महाबीजमध्ये अधिकारीच टिकेना; पुन्हा एमडींची बदली

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 'नापसंती'चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण वर्षभराच्या आतच एमडींची बदली होत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 17 फेब्रुवारी 21 ला महाबीज मुख्यालय गाठले. आल्या आल्या कामकाजाचा आढावा घेतला. नंतर अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाल्याचे आदेश धडकले. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केल्या गेली.

हे देखील पाहा -

रेखावार हे सुद्धा अनेक दिवस रुजू झालेच नाहीत. दरम्यान त्यांचाही बदली आदेश धडकला. त्यांनतर ऑक्टोबर 21 मध्ये महाबीजचे एमडी म्हणून रुचेश जयवंशी यांनी महाबीजची सूत्रे हाती घेतली. मात्र वर्षभराच्याआतच त्यांचा बदलीचा आदेश धडकला आहे. नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नासपसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहेत.

का नको आहे आयएएस अधिकाऱ्यांना महाबीज?

अकोल्यात राज्याचे मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली. बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कार्य महाबीजमध्ये होते. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. वरिष्ठ ‘आयएएस’ या पदावर काम करण्यास इच्छूक नसतात.

या पदावर काम करण्यात ‘कमी’पणाची भावना असल्याने अधिकाऱ्यांचे इतरत्र बदलीसाठी प्रयत्न सुरू असतात. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होत असल्याचा प्रत्यय गत दशकभरात वारंवार आला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महाबीजला व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यकाळ पूर्ण करणारा अधिकारी मिळत नसल्याने नफ्यात चालणाऱ्या या संस्थेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT