Cotton price saam tv
ऍग्रो वन

Cotton: पांढऱ्या सोन्याच्या भावात चढउतार; अकरावर गेलेला भाव पुन्हा आला खाली

पांढऱ्या सोन्याच्या भावात चढउतार; अकरावर गेलेला भाव पुन्हा आला खाली

जयेश गावंडे

अकोला : गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अकरा हजार रूपयांवर गेलेले कापसाचे दर पुन्‍हा खाली आले आहेत. (akola news Fluctuations in white gold cotton prices)

आंतरराष्ट्रीय बाजारात रुई आणि सरकीच्या दरात वाढ झाल्याने विदर्भाच्या बाजारात कापसाला (Cotton) दहा हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा साडे चार हजार रुपयांहून अधिकचा दर क्विंटलमागे मिळत आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे हादरलेल्या शेतकऱ्यांना (Farmer) ही दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे. अशातच काल अकोट बाजार समितीत पांढरं सोने अकरा हजारावर गेला होता.

दर पुन्‍हा खाली

विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या दराने 11 हजारांचा टप्पा (Cotton Price) गाठला होता. गेल्या पन्नास वर्षातील कापसाचा हा विक्रमी भाव होता. तर आज अकोट बाजार समितीत कापसाला 10 हजार 425 रुपये इतका भाव मिळालाय. कापसाच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत.

पंधरा हजारावर पोहचतील दर?

अकोल्यातील (Akola) अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे. बोंडअळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तर देशातील महाराष्ट्रसह अनेक राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. सध्या कापसाच्या दरात चढउतार जरी सुरू असला तरी येणाऱ्या काही दिवसांत पांढऱ्या सोन्याला आणखी चकाकी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पांढरे सोने पंधरा हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT