Farmer Rasta Roko Saam tv
ऍग्रो वन

Farmer Rasta Roko : कापूस बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; अकोल्यात केला रास्तारोको

Akola News : खरीप हंगाम जवळ आल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा करत आहेत

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. प्रामुख्याने कापूस बियाणे खरेदी केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे अकोल्यात शेतकरी चांगले आक्रमक झाले असून अकोल्यातील टिळक रोडवर रास्ता रोको करीत आपला रोष व्यक्त केला. 

खरीप हंगाम जवळ आल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा करत आहेत. मात्र कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत चक्का जाम आंदोलन केले. या हंगामात बी- बियाणे खरेदीला सुरुवात झाली. यंदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे (Akola) जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. 

केंद्रावर नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या (Farmer) हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शेतकरी चांगलाचं आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी वैतागून रास्ता रोको आंदोलन केले. अनेक गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्का जाम केला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT