अक्षय गवळी
अकोला : कापसाचे बियाणं बाजारात मिळत नसल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. एकीकडे कापसाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. याचवेळी अकोल्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार आणि असंवेदनशीलपणा समोर आला आहे.
जादा उत्पन्न मिळत नसल्याने अजित १५५ या बियाण्याची मागणी अधिक होत आहे. मात्र कापसाचे बियाणे मिळत नाही. बियाणे मिळावे यासाठी शेतकरी कृषी केंद्राबाहेर सकाळपासून रांगेत उभे राहत आहे. दरम्यान आज कृषी केंद्र उघडण्यात न आल्याने शेतकरी संतप्त झाले व रस्त्यावर उतरले होते. हे बियाणे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मात्र अतिशय उद्धटपणे उत्तर दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
काय म्हणाले अधिकारी शेतकऱ्याला
दरम्यान शेतकरी गोपाल ठाकरे यांनीं जिल्हा कृषी अधिकारी यांना फोन लावून बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली. अजित १५५ च्या बॅगा पाहिजे होत्या अशी मागणी केली. मात्र कुठेच बॅगा नाहीत. काल पूर्ण विक्री होऊन आटोपल्या असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण आम्हाला बियाणं पाहिजे ना साहेब असे शेतकऱ्याने म्हणताच कृषी अधिकारीने अहो बियाणं काय आपल्या चॉकलेटसारखं आहे का?; आपण तयार करू, उत्पादन करू. आठ महिने लागतात उत्पादन करायला; असे उत्तर शेतकऱ्याला दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.