Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News : सततच्या पावसाने यंदाही नुकसान; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Akola News : यंदा देखील तीच परिस्थिती असून शेतातून उत्पन्न येईल याची हमी नव्हती. यामुळे विवंचनेत असलेल्या निलेश ठाकरे यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कुटुंबियांनी सांगितले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यंदा देखील तीच परिस्थिती उद्भवली असून सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात समोर आली आहे. 

अकोट (Akot) तालुक्यातील मुंडगाव गावातील निलेश दशरथ ठाकरे (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं (Farmer) नाव आहे. निलेश ठाकरे यांच्या डोक्यावर अगोदरच कर्जाचा आर्थिक बोजा होता. शिवाय सततच्या नापिकीला ते कंटाळले होते. यंदा देखील तीच परिस्थिती असून शेतातून उत्पन्न येईल याची हमी नव्हती. यामुळे विवंचनेत असलेल्या निलेश ठाकरे यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. 

दहिगावच्या शेतकऱ्याने सोयाबीन फेकले उपटून 
निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून अकोल्यात (Akola News) एका शेतकऱ्याने देखील ठोस निर्णय घेतला होता. हजारो रुपये खर्च आणि कीटकनाशक फवारणी करूनही शेतातल्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाही. अखेर त्रस्त होऊन शेतकऱ्यानं शेतातले सोयाबीन उपटून फेकले होते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहिगाव येथील प्रमोद जुमडे यांनी आपल्या शेतातले सोयाबीन पिक उपटून फेकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT