Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळीसह गारपीट; केळी पिकांचे मोठे नुकसान

Akola News : आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाला समोर गेला.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोला जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या दरम्यान सोमवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपिट झाली. यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या काही गावांना या गारिपिटीसह पावसाचा फटका बसला आहे.

आधीच (Akola) अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाला समोर गेला. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील धामणगाव शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. गारपिटीमूळे तोडणीवर आलेल्या केळी पिकाला (Banana Crop) जबर मार बसला. तर पावसासह वाऱ्यामूळे केळी झाड अक्षरशः जमिनीवर कोसळले आहे. तर काही भागात केळी पिक भुईसपाट झाले आहे. 

या भागात गेल्या काही दिवसांत अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाका बसला आहे. दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी (farmer) शेतकऱ्यांकडून होत आहे. केळीच्या लदबदलेली फळबागा जोराच्या वाऱ्यामुळे पूर्णतः भुईसपाट झाल्याचे दिसत आहे. पावसासह गारपिटीची तीव्रता इतकी होती की अनेक केळीचे झाडे उन्मळून पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT