Cyclone effect 
आज पाहा

#तौत्के चक्रीवादळ : सिंधुदुर्ग किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट!

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, चक्रीवादळात त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 'तौत्के'असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५, १६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' दिला आहे. Toutke Cyclone Orange Alert to Sindhudurg District

या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ तोक्ते मध्ये १२ तीसात बदल होतील. त्यानंतर यामध्ये तीव्रता पाहायला मिळेल. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे.शनिवार सकाळपर्यंत तौत्के चक्रीवादळ हे त्याच भागात असेल. त्यानंतर रविवारी  १६ मे रोजी चक्रीवादळामध्ये तीव्रता येईल. 

यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. Toutke Cyclone Orange Alert to Sindhudurg District

या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील लोकांना १५ ते १७ मे दरम्यान सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आय.एम.डीने वर्तविला आहे. 

आज संध्याकाळपर्यंत उत्तर-उत्तर-पूर्वेकडे जाईल. त्यानंतर ते उत्तर-वायव्य दिशेने जाईल आणि १८ मे रोजी गुजरात किनाऱ्यावर धडकेल. शनिवारपासून रायगडमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर रविवारी आणि सोमवारी कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात वेगळ्या ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Toutke Cyclone Orange Alert to Sindhudurg District

दरम्यान, राज्य शासनाने १ जूनपर्यंत राज्यात कोरोना टाळेबंदी लागू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यंदाचा सागरी पर्यटन हंगाम जवळजवळ संपल्यातच जमा आहे त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक व्यावसायिकांनी आपल्या नौका कालपासून किनाऱ्यावर घ्यायला सुरवात केली आहे. त्यातच हवामान विभागाने अरबी समुद्रात चक्रवादळाचा ईशारा दिल्याने त्याला आणखी वेग आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमण वाढल्याने पुरातत्व विभागाने १५ मे पर्यंत सिंधुदुर्ग किल्ला बंदचे आदेश दिले होते. निदान १५ मे नंतर तरी कोरोना परिस्थितीत सुधारणा होऊन हंगामाच्या सरतेशेवटी आपल्याला काही दिवस सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरु करता येईल, या आशेवर असलेल्या किल्ला प्रवासी वाहतूकदारांची टाळेबंदी वाढल्यामुळे निराशा झाली आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT