cm uddhav
cm uddhav 
आज पाहा

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वैदेही काणेकर

अहमदनगर: कोरोना Corona संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा Saibaba विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन Oxyegenनिर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर RTPCR प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री CM उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeary यांनी काढले. Through the Oxygen Generation Project the Saibaba Trust upheld the teachings of humanity

तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती राज्यातच होईल, यासाठी प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पहा -

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. Through the Oxygen Generation Project the Saibaba Trust upheld the teachings of humanity

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्ग भोसले, श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदीसह रिलायन्स फौंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमात दूरदूश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले.

दुसर्‍या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. आपल्याला ऑक्सीजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले. आपल्या राज्यासाटी आवश्यक ऑक्सीजन निर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी असे प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.Through the Oxygen Generation Project the Saibaba Trust upheld the teachings of humanity

श्री साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत. साईबाबा संस्थानने हाच सेवेचा वारसा पुढे चालविल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले, संस्थानने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. याशिवाय, आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

असा आहे ऑक्सिजन प्रकल्प

प्रास्ताविकात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांनी या प्रकल्पाकरीता रिलायन्स फांऊडेशन  तर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले असल्याची माहिती दिली.  Through the Oxygen Generation Project the Saibaba Trust upheld the teachings of humanity

संस्थानच्या वतीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतुन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट असुन त्याव्दारे साईनाथ रुग्णालयातील 300 बेड करीता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरण पुरक असुन तो 24 तास कार्यरत राहणार असुन त्याकरीता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही. आभार उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मानले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

SCROLL FOR NEXT