Saam AAj paha
Saam AAj paha 
आज पाहा

राजीव सातव - एक झुंज अपयशी!

काँग्रेसचे Congress खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचं पुण्य़ात जहांगीर रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. काही दिवसांपुर्वी त्यांनी कोरोनाशी Corona यशस्वी झुंज दिली होती. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. पण पुन्हा त्यांच्या शरिरात नवा विषाणू Virus आढळला आणि एका उमद्या नेत्याचा प्रवास अवघ्या ४७ व्या वर्षी अकाली संपला. Special Episode on Saam Tv on Congress Leader Rajiv Satav Death

राहुल गांधी Rahul Gandi यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. गुजरात काँग्रेसचे Gujarat ते प्रभारी होते. राजीव सातव म्हणजे निगर्वी साधेपणा, उमदेपणा, तत्वासाठी आक्रमकपणा. हिंगोली ती दिल्ली असा प्रवास त्यांचा जिद्दीचा प्रवास होता. राजकारणाचे बाळक़डू त्यांना आई रजनी सातव Rajani Satav यांच्याकडून मिळालं. त्याही आमदार होत्या. शरद पवार Sharad Pawar यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होत्या.

हे देखिल पहा - 

राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द पंचायत समितीपासून सुरु झाली. हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीचे ते २००२ मध्ये सदस्य झाले. २००७ मध्ये चे हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कृषी आणि पशुसंवर्धन सभापती झाले. २००८ मध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २००९ मध्ये ते पहिल्यांदा कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. Special Episode on Saam Tv on Congress Leader Rajiv Satav Death

२०१० मध्ये त्यांच्यावर अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये सातव हिंगोली लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. २०१८ मध्ये सातव काँग्रेसचे गुजरात प्रभाली बनले. २०२०  मध्ये महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर नियुक्त  झाले.

संसदेत विविध समित्यांवर त्यांनी काम केलं होतं. सर्वपक्षातल्या नेत्यांची त्यांचा चांगला संपर्क होता. २१ सप्टेंबर १९७४ रोजी मसोड या कळमनुरी तालुक्यातील गावात त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या Fergusson College आणि आयएलएस लॉ कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण झालं. २००२ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.  Special Episode on Saam Tv on Congress Leader Rajiv Satav Death

पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या मित्रांशी त्यांचा राजकारणात धबडग्यातही शेवटपर्यंत संपर्क होता. गुणवत्ता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हिंगोलीसारख्या छोटया जिल्हातून झेप घेत राजीव सातव यांनी राष्ट्रीय राजकारणात छाप पाडली. उच्चशिक्षित, अभ्यासू असलेले राजीव सातव यांनी आक्रमपणे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला.  काँग्रेसच्या आश्वासक नेतृत्वामध्ये त्यांचा समावेश होता. राजीव सातव यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचं तर नुकसान झालं आहेच पण भारतीय राजकारणानंही एक अभ्यासू आणि जनतेसाठी लढणारा नेता गमावला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT