आज पाहा

नक्की वाचा | मुंबईतल्या बाजारपेठा कश्या सुरू राहणार

साम टीव्ही न्यूज

मुंबई:लॉकडाउनचे जवळपास चार टप्पे पार पडल्यानंतर 'अनलॉक १'च्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठा, दुकाने (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) सम, विषम तारखेला सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर दुकानांच्या बाहेर सुरक्षेचे निकष पाळत खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दुकाने उघडण्यापूर्वी अनेक दुकानमालकांकडून ग्राहकांना स्वतःहून सुरक्षित वावर राखता येईल यादृष्टीने विशेष सोय करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तसेच सामानाची देवाण-घेवाण करताना ग्लोव्हज वापरले जात होते. दुकान परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. सर्व कामगारांना मास्क, ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.


' मिशन बिगिन अगेन 'च्या निमित्ताने अनेक ठिकाणी नागरिकांनी प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांना बोलावून घरातील दुरुस्तीची कामे करून घेतली. अनेक सोसायट्यांच्या आवारात मास्क, सॅनिटायझर जवळ बाळगल्याशिवाय प्रवेश नाकारून शासनाने घालून दिलेले नियम पाळण्यात येत होते. एकूणच सर्व सुरक्षेचे निकष पाळत 'अनलॉक १'च्या पहिल्या दिवशी मुंबईकरांच्या खरेदी-विक्रीचा पुन्हा आरंभ झाला.

केवळ दुकानदारांनीच नव्हे, तर ग्राहकांनाही सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, फेस प्रोटेक्शन, सॅनिटायझर आदी गोष्टी जवळ बाळगल्या होत्या. मेडिकल, किराणामाल दुकानांबरोबरच स्टेशनरी, वडापाव विक्रेते, छोट्या-मोठे भाजीपालाविक्रेते यांनाही पूर्वीप्रमाणे आपापली दुकाने थाटली होती. मात्र काहीजणांचा अपवाद वगळता कुठल्याही फेरीवाल्याकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसले नाही. उपनगरांतील काही भागांमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा अंदाज घेत पोलिसांकडून सौम्य कारवाई करण्यात आली.

तब्बल अडीच महिन्यांच्या लांबलचक लॉकडाउन निर्बंधांनंतर अखेर शुक्रवारी मुंबई व अन्य शहरांतील अनेक दुकानांची दारे उघडली गेली. लॉकडाउनमुळे तिजोरीत झालेला खडखडाट 'पुनश्च हरिओम'च्या निमित्ताने काही प्रमाणात भरून काढता येणार असल्याने दुकानदारांच्या मास्क लावलेल्या चेहऱ्यांवर हास्य खुलले होते. घरात अडकून पडलेल्या लाखो नागरिकांनीही खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत मास्क लावून का होईना मोकळा श्वास घेतला. यावेळी काही अपवाद वगळता सर्वत्र शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे चित्र दिसून आले.

WebTittle::Read exactly | How will the markets in Mumbai continue?


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT