Youth Failing Pray to Sextortion
Youth Failing Pray to Sextortion 
आज पाहा

सावधान........नोकरदार तरुणाई होतेय सेक्सटॉर्शनची शिकार...

रोहिदास गाडगे

पुणे : तुम्ही जर सोशल मीडिया Social Media वापरत असाल तर ही बातमी आवर्जून बघा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची Sextortion शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येतेय. पुणे सायबर पोलिसांत Cyber Police दोन गुन्हे तर १५० तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय. Pune Youths Felling Pray to Sextortion through Social Media

- सोशल मीडिया हाताळत असाल तर सावधान !
- नोकरदार तरुणाई होतेय सेक्सटॉर्शनची शिकार
- पुण्यात दोन गुन्हे तर १५० हून अधिक तक्रारी 
- सोशल मीडियाच्या माध्यमातून खंडणीचा नवा फंडा

पुण्यातील Pune शिवाजीनगर Shivajinagar येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे, लॉकडाऊन Lock Down काळात घरी असतांना फेसबुक वापरत असतांना एका मुलीची त्याला फ्रेन्ड रिक्वेस्ट Friend Request आली होती. त्यांच्यानंतर थेट व्हॅटसअँप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ व्हॅट्सअऍप ला येऊन धडकला आणि पैश्याची मागणी होऊ लागली. Pune Youths Felling Pray to Sextortion through Social Media

पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करेल असा दमही भरला. हे फक्त याच तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात १५० हून अधिक जणांच्या बाबत घडलंय. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तीचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झालेय. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतलीय. दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहे. 

या मध्ये काय काळजी घ्याल. 
- अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका 
- परिचित नसल्यास व्हॅटसअँप कॉल वर संवाद साधू नका 
- व्हिडीओ, छायाचित्र पाठवतांना विचार करा 
- चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संवाद साधा. Pune Youths Felling Pray to Sextortion through Social Media

मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर बघून सायबर गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनतात. त्यामुळे काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करा. 

सोशल मीडियावर ओळख करणे, या मैत्रीचे एका भावनिक नात्यात त्या मैत्रीचे परिवर्तन करणे. आणि हळूहळू पैसे उकळणे अश्या घटना वारंवार समोर येताय. पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती आणि आवाहन देखील केलं गेलं. पोलिसांच्या तपासात काय ते समोर येईलच मात्र पुण्यातील घटना गंभीर आहेत. त्यामुळे नागरिकांनो वेळीच सावध व्हायला हवं

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske News | नवी मुंबईपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी

Viral Video: युट्यूबरची भेटवस्तू पाहून गरीब मुलीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

SCROLL FOR NEXT