आज पाहा

VIDEO | सूर्यग्रहणावेळी अंडं स्थिर उभं राहतं ?

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

ग्रहणांबाबत आपल्या देशातच नव्हे परदेशातही गैरसमज आहेत...ग्रहण म्हणजे नक्की काय याबद्दल पूर्ण माहिती नसल्याने कुणीही कोणताही दावा करू लागलाय...पण, आता मलेशिया-इंडोनेशियामध्ये सूर्यग्रहणाच्या काळात अनेक व्हिडीओ व्हायरल झालेयत...सूर्यग्रहणाच्या काळात अंडे उभे राहत असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, हा दावा कितपत खरा आहे याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न आम्ही केला...त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा...


सूर्यग्रहणावेळी पृथ्वी,चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येतात त्यावेळी गुरुत्वाकर्षणामुळे अंडे उभे राहत. 
हा दावा केल्यानं याचं सत्य पडताळण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला...याबद्दल अधिक माहिती खगोलशास्त्राचे अभ्यासक देऊ शकतात...त्यामुळं आमचे प्रतिनिधी अभ्यासकांना भेटले आणि या दाव्याबद्दल अधित माहिती जाणून घेतली... सूर्यग्रहणात अंडं स्थिर उभं राहतं याबद्दल वैज्ञानिक आधार नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय...पण, व्हिडीओत अंडं स्थिर उभं राहिलेलं कसं काय दिसतंय याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली... 

सूर्यग्रहणामुळे अंडे टोकदार भागावर स्थिर उभे राहतं असा कोणताही सिद्धांत नाही

अंडे अशा स्थितीत सूर्यग्रहणाच्या आधी किंवा नंतरही स्थिर होऊ शकते

अंडं उभं ठेवून व्हिडीओ बनवून चुकीचा दावा केला

सूर्यग्रहणावेळी अंडं स्थिर उभं राहतं याला वैज्ञानिक आधार नाही

त्यामुळं अशा व्हायरल व्हिडीओ आणि मेसेजवर विश्वास ठेवू नका...लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडीओ व्हायरल केले जातात...या दाव्याला कुठलाही शास्त्रीय आधार नसून, आमच्या पडताळणीत सूर्यग्रहणात अंडं स्थिर उभं राहतं हा दावा असत्य ठरला...

WebTittle : Does the egg stand still during the solar eclipse?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT