हिरडा खरेदी दोन वर्षांपासून बंद; आदिवासी संतप्त..(पहा व्हिडिओ)

Tribals Working on their Farm products
Tribals Working on their Farm products

पुणे : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आदिवासी समाज राहतो मात्र  आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत सध्या आदिवासी भागात हिरडा तोंडणी जोरात सुरू आहे त्यामुळे हिरडा खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत, ही खरेदी गेली दोन वर्ष महामंडळाकडून बंद आहे. त्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्न आदिवासी बांधवला पडला आहे. Tribals in Pune District worried about their Products Sell

यावर्षी अवकाळी पावसामुळे हिरडा कमी अली आहे . हिरडा या झाडावरून दोन प्रकारात घेण्यात येते. बाळहिरडा हा माल एप्रिल, मे महिन्यात झाडावरून गोळा केला जातो. तो कडक उन्हात वाळवून सुका करून त्यांची विक्री केली जाते.मात्र यावर्षी अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे. मोठा हिरडा हा माल झाडावर परिपक्व झालेला असतो. त्याला बी आलेलीअसते हा माल झाडावरून आॅक्टोबर- नोव्हेंबर या दोन महिन्यात झाडावरून गोळा केला जातो.

आदिवासी शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा माल खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंंडळाची निर्मिती करण्यात आली आहे परंतु आदिवासी विकास महामंंडळ आदिवासी शेतकर्‍यांकडून गेल्या चार वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्याचा बाळ हिरडा माल खरेदी करत नाही. हा संपूर्ण माल आदिवासी विकास महामंंडळानी खरेदी न केल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आदिवासी शेतकऱ्यांची बाळ हिरडा मालाची खरेदी सुरु करावी,  म्हणून आम्ही संबंधित आदिवासी विकास महामंंडळ मुख्य कार्यालय नाशिक यांच्याकडे नऊ महिन्यांपूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती, असे आदिवाशी शेतकऱ्यांनी सांगितले. Tribals in Pune District worried about their Products Sell

मे महिन्यात बाळहिरड्याची झाडावरून काढणी सुरू आहे विक्री शेतकऱ्यांनी चालू केली आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल आदिवासी विकास महामंंडळ व खाजगी व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक वेळा आदिवासी विकास महामंंडळाकडे प्रत्यक्ष भेटूनही  व लेखी मागणी करूनही महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही व हिरडा खरेदी सुरू केलेली नाही, अशी तक्रार या आदिवासी शेतकऱ्यांनी केली. Tribals in Pune District worried about their Products Sell

आदिवासी विकास महामंडळाच्या विकासाच्या योजना बंद केल्या आहेत. आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतकर्‍यांच्या विकासाच्या योजना उदाहरण ( वरई, सावा, भात, नाचणी ), सर्व प्रकरणाची धान्य खरेदी बंद आहे.  त्यामुळे आदिवासी शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात तोटा होत असून अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आदिवासी शेतकर्‍यांच्या बाळहिरडा या मालाची तातडीने खरेदी सुरु करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाला देण्यात यावेत एवढीच अपेक्षा.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com