सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे..! विक्रेत्यांचा अजब फतवा

Soyabean Seed Traders new funda
Soyabean Seed Traders new funda

अकोला : सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती. त्यातून यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार, पण जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. Seed Traders not taking Responsibility of the quality 

थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. ‘सदर सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील सोयाबीन विक्रेत्यांनी देयकावर मारला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे.

हे देखिल पहा

यातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी, हा प्रश्नच आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरीच यात फसवल्या जाण्याची भिती अधिक आहे. Seed Traders not taking Responsibility of the quality 

बियाण्यांची जबाबदारी संबधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरही समप्रमाणात राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसतो. मात्र, आता विक्रेत व बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकत असेल तर अशा व्यवहारात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या गेल्यास शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी कुणाचे द्वार ठोठवावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

विक्रेत्यांनी झटकले हात, सरकार जबाबदारी घेणार का?  
शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून सरकारपासून सारेच हात झटकत असल्याचे दिसून येत आहे. कृषी सेवा केंद्र  दुकानदार थेट देयकावर बियाणे विक्रीनंतर ते कसे निघणार याची जबाबदारी विकत घेणाऱ्यांवरच टाकत आहेत. बिलावर शिक्का मारून  जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. बियाणे कंपनीही बियाण्यांच्या उगवण क्षमतेची जबाबदारी घेण्यास तयार नाही तर  बियाणे कंपनी व विक्रेत्याला परवानगी देणारे सरकारही जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. Seed Traders not taking Responsibility of the quality 

गेल्या हंगामातील अनुभव वाईट
तेल्हारा तालुक्यातील मागिल वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली होती; मात्र बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याने पेरणीनंतर ते उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीन बियाणे आणून दुबार पेरणी केली. तेही बियाणे क्षमतेनुसार उगवले नाही. त्यामुळे मागिल वर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाली. यावर्षी पेरणीचे दिवस येत असताना कृषी सेवा केंद्र संचालकांनी बियाणे विकत घेत असताना बिलावर बियाणे न निघाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे शिक्के मारुन जबाबदारी झटकली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com