उष्णतेने जनावरांना किरकोळ आजार जडल्याने दुधाचे प्रमाण घटले

गावखेड्यातील पशुपालक शेतकऱ्यांना उन्हाळी आर्थिक झळा
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने, उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून जिल्ह्यात 41 अशांवर तापमान येऊन पोहचला आहे. यामुळे याच्या झळा आता पशुपालक शेतकऱ्यांना (Farmer) बसू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळं पशुपालक शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. उष्णतेच्या लाटेने दुभती जनावरे आजारी पडू लागल्याने दुध उत्पादनात घट झाली असून त्यामुळे दूध संकलनही कमी झाले आहे.

हे देखील पहा -

बीड जिल्हा हा दूध उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. मुबलक चारा, नगदी पैसा यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून गावोगावी दुग्ध व्यवसायाने बाळसे धरलेले आहे. मात्र उष्णता वाढल्याने आता दुधाचे प्रमाण कमी झाल्याचं दूध संकलन केंद्र चालक अशोक काळकुटे यांनी सांगितल आहे. तर दुभत्या जनावरांना उष्णतेने धाप लागणे, लाळ गळणे, अपचन, चारा कमी खाणे, यामुळं दुध घटल्याचे दूध उत्पादक शेतकरी भास्कर कदम यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com