कारखान्याला ऊस न गेल्याने शेतकऱ्याचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

कारखान्याला ऊस न गेल्याने शेतकऱ्याचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
Farmer
FarmerSaam tv

लातुर : सध्याला ऊसाचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी येथील शेतकरी रामदास पाटील यांचा शेतातील ऊस विकास कारखान्याने घेऊन न गेल्याने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी (Police) वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे. (latur news farmer Attempt to take the water of the as the sugarcane did not reach the factory)

Farmer
पावसाळा तोंडाशी तरी ऊस तोडणी नाही; शेतकरी चिंतेत

लातुर (Latur) जिल्ह्यात १३ साखर कारखाने असून ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस गाळपाला आणला. पण जिल्ह्यातील ऊस (Sugarcane) शिल्लक राहिला आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी अनेकदा चकरा मारल्या. पण ऊस गाळप करण्यासाठी गेला नाही. रामदास पाटील यांचा विकास कारखान्याने ऊस घेऊन न गेल्यामुळे रामदास पाटील यांनी आज (15 मे) तिरु प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वाचविले प्राण

यावेळी वाढवणा पोलिसांनी रामदास पाटील या शेतकऱ्यांला (farmer) जलसमाधी घेताना सदरील शेतकऱ्यांचे प्राण वाचवले व शेतकऱ्यांना वाढवना पोलिसांनी ताब्यात घेवून वाढवणा पोलीस ठाण्यात नेण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी महविकास आघाडीवर सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com