समाजकंटकांनी पपईच्या बागेचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल

sheti nuksan
sheti nuksan

जुन्नर - तालुक्यात शेतकर्‍यांच्या Farmer मालाचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान Damage  केल्याचा प्रकार समोर आला आहे. बोरी Bori गावातील शेतकरी बारकु प्रभाकर जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पपईची Papaya बाग अज्ञात समाजकंटकांनी उध्वस्त Devastated केल्याने शेतकऱ्यांवर  मोठे आभाळ कोसळले आहे. Farmers are worried as papaya orchards have been damaged 

आधीच लॉकडाऊन Corona Lockdown,आवळी पाऊस Rain अशा संकटांचा सामना करत शेतकरी उभा रहात असताना जुन्नर Junnar तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान करण्याच्या प्रकार समोर आला आहे. बोरी गावात पपई बाग,कलिंगडे Watermelon फोडून व कलिंगड वेल तोडुन अज्ञात समाजकंटकांनी उध्वस्त केल्याने  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बारकु जाधव यांनी हजारो रुपये खर्चून ही पपईची बाग उभी केली होती. काही दिवसांतच या बागेतून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार होते. मात्र, अशातच पपईच्या बागेत घुसून सुमारे ४०० ते ५०० नग पपई तोडून जागेवरच फेकून देण्यात आल्याने या शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. Farmers are worried as papaya orchards have been damaged 

पपई बागेचे नुकसान केल्यानंतर या समाजकंटकांनी आपला मोर्चा रंजन जाधव यांच्या कलिंगड बागेकडे वळवला. या बागेतील ३५ ते ४० कलिंगडे फोडून व कलिंगड वेल तोडुन मोठे नुकसान करण्यात केले. वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या घटनांना गंभीरतेने घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com